Tomoae a Obsession


Tomoae English School, Buldana

http://www.tomoaeenglishschool.com/


  तोमोई एक ध्यास   

लोकप्रियतेच्या हव्यासा पलिकडे जाऊन एखादी शाळा उदयाला येते ती फक्त कथेत वाचलेल्या चिनी मुलीच्या आयुष्यातील तोमोई शाळा ही कशी तिच्या जडणघडणीला कारणीभूत ठरली म्हणून नव्हे तर समाजातील वाडत असलेली पालकांची वैचारिक गुंतवणूक जी एका मोठ्या इमारती भोवती फिरन असते, मुलांनी त्यांच्या आयुष्यात एक विशिष्ट टप्पा गाठावा, विविध परीक्षा पास वाह्व्या आणि  प्रतिष्टीत चाकोरीत शिस्तबध आयुष्य जगाव इतकच नं.... पण यापुढे जाऊन ही एक पोकळी उरते ती म्हणजे  चिकित्सक नजरेनी वास्तव काय आहे हे शोधण्याची हजाराच्या संख्येने शाळा भारतात एकाएका वर्गीन ६०-६० विध्यार्थी बहुदा जास्त असावेत इनके बसंतान खरंच जगा वैर्मात एक शिक्षक प्रत्येक विद्यारर्यापर्यंत जाऊ शक्न असेल का ? त्याला प्रत्येक गोष्ट समजत असेल का विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा काही परिणाम होत असेल का। एकदा शाळेत प्रवेश घेतला की आठवी पर्यंत पैसे मोजायचे त्यानंतर काही येत नसेल तर ऐन ९वी त टि.सी दिला जाते है कितपत योग्य? सर्वांगीण विकास फक्त एका पेपर वर बाकी कित्येक लढाया जिंक्यण्या पूर्वीच शश्त्र घेऊन टाकले जातात ,यापेक्षा हि भयावह परिस्तिथी....फक्त वैचारिक गोंधळ.

        पण, बुलढाण्यातील जांभरून रोड ला असणारी   डोंगराच्या कुशीत उभी असणारी एक वास्तू  जी  तोमोई  इंग्लिश स्कूल या नावाने गेली ७ - ८ वर्ष झाली उभी आहे 

 कदाचीन अजुनही नाव माहित नसणारी व्यक्ति सापडेल कारण कु‌णाला concept base school. असतं हे माहीतच नाही आणि मोठी , वळणावर राहून आपण फारसा विचार करत ही नाही कारण हल्ली असण्यापेक्षा दिसण्यावर भर दिला जातो. पण आमूच्या तोमोईच्या सर्व संचालकाची दूर दृष्टी हि  शाळेला बळ देणारी आहे, CBSE ची  उदुष्ट्ये नेमकी काय व ती कशी रुजावी या साठी आवर्जून स्वताः अभ्यास करून विध्यार्थ्यांच्या कुटुंबाचा विचार तसंच विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विचार करून शाळेला एक नवे रूप वारंवार दिला जातो. गर्व- अहंकार यातला एक  हि गुण  मला कधी या व्यक्ति मध्ये दिसला नाही. शिक्षकांच्या चेहऱ्यावरून जे ओळखता अश्या संचालक पदावरील व्यक्ती मी पूर्वी कधी पहिला नाही.

    ठिक ठिकाणी शाळेचे पोस्टर लावून टिवी मध्य ad देऊन, मोठेपणा मिरवता आला असता, ते   करायलाही हवं होतं पण असा मोठेपणा त्यांना कुणालाच नको होता, या व्यक्तिना मुलामध्ये शिक्षणाने जी बीजे रोवावित, अस वाटते त्यांवरच फक्त भर दिला जातो. पालकांना खरेपणा सांगितला जातो, बऱ्याचवेळा फक्त मार्क पाहले जातात. बालकाचा सर्वांगिण विकास व्हायला हवा हा विचार पालकांच्या मनातही येत नाहीं का? कारण हल्ली Order दिली की ready made मिळावं असं प्रत्येकाला अपेक्षीत आहे. अरे या स्पर्धेच्या युगात मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या कित्येक जिवांचा श्वास समजून न घेतल्याने कोंडला जात आहे.

     पण तोमोईत तसं नाही विश्वास आजही इथे जिवंत आहे मुख्याध्यापकाचे सर्व शाळेवरील प्रेम सोबतच शिक्षकांचा आपआपल्या विषयातील बारकावे काढून विध्यार्थ्यांना शिकवण्यातील मग्नता त्याच बरोबर आपुलकी. हे सर्व ईथेच बघायला मिळेल.........

 आमची अशी एकमेव शाळा आहे की, जीला बुलढाण्यातील अनुभवी डॉकटर वकिल शिक्षक तसेच व्यावसायीक संचालकांचे मार्गदरति लाभले आहे, आमच्या या संचालकांच्या डोक्यात का बर आले असेल की विदयार्थ्यांना समजून घेणारी शाळा काढावी ? पैसा... हो, ही एक बाजू  असली तरीही आजवर केवळ कुठल्याही बैनरच्या आधारे शाळेचे नाव त्यांनी घेतले नाही. त्यांच्या ध्यासाची वर्षे पुढे-पुढे सरसावत आहे. आणि मला या ध्यासाचा अनुभवू जनसामान्या पर्यंत पोहचवायची आहे. कारण मी जे अनुभवते तेच लिहीते. यापूर्वीही मी अनेक ठिकाणी शैक्षणिक उलाढाली बघितल्या पण पेन आणि विचार सुसंगती यायला मला तोमूईतच यावं लागले.

     माझ्या या मंदिराची पायाभरणी ही मुळात या चिमुकल्यांच्या विकासासाठी झालेली आहे, वेगळेपणे नक्कीच भविष्याला आकार देणारं आहे. ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही.



तोमोई इंग्लिश स्कूल, बुलढाणा 

अनुराधा दत्ता  घोडके  (शिक्षिका) 


Created by - Teena R. Kumawat 

Class- 10th

Comments

Popular posts from this blog

Tomoae Montessori House of Children